तिसर्या दिवशीही सात जणांना त्रास : जिल्हा आरोग्य अधिकार्यांची भेट
यावल- तालुक्यातील किनगाव खुर्द व बुदु्रक येथे तिसर्या दिवशीही अतिसाराचे सात रुग्ण आढळले तर यातील पाच जणांना जळगावात तर दोघांवर किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. आरोग्य विभागाने गावातील साथ आटोक्यात आल्याचा दावा केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून अतिसाराने गावात थैरात घातल्याने दोघांचा मृत्यू झाला असून 50 वर ग्रामस्थांना आजाराची लागण झाली आहे. मंगळवारी जिल्हा आरोग्य अधिकारी बबिता कमलापूरकर, जिल्हा परीषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.बी.बोटे, आरोग्य सभापती दिलीप पाटील, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी यांनी गावाला भेट देत काही सूचना केल्या. दरम्यान, आरोग्य विभागाकडून ग्रामस्थांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून पाणी उकळून व गाळून पिण्यासह स्वच्छता राखण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.बर्हाटेंसह पथक गावात तळ ठोकून आहे.