यावल : तालुक्यातील किनगाव बाळु उर्फ मुकुंदा बाबुलाल लोहार (30) या सिरीयल किलरला गावातील वृद्ध महिलेच्या खून प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आरोपी मुकूंदा लोहारविरोधात तीन खुनाचे गुन्हे दाखल आहेत.
दुसर्या गुन्ह्यात आरोपीला अटक
यापूर्वी जळगाव रस्त्यावरील आत्माराम नगरातील रहिवासी मराबाई सखाराम कोळी (75) या वृद्धेच्या खुन प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली व नंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती तर आता किनगाव बुद्रुक येथील चौधरी वाड्यातील रहिवासी रूख्माबाई कडू पाटील (70) यांच्या खुनाच्या गुन्ह्यात त्यास अटक करण्यात आली. त्यास गुरूवारी येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्या.एम.एस.बनचरे यांच्या न्यायासनासमोर हजर केले असता त्यास 8 जुलैपर्यंत एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद गोसावी, पोलिस उपनिरीक्षक सुदाम काकडे, सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण, हवालदार जगन्नाथ पाटील करीत आहे.