किनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी

यावल : तालुक्यातील किनगाव गावातून चोरी केल्याप्रकरणी शेख जावेद शेख जहाँगीर व शेख हारून शेख जलाल यांना अटक करण्यात आली. संशयीताना न्यायालयात हजर केले असता 31 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. किनगाव सत्तार बिस्मिल्ला पिंजारी यांची दुचाकी (क्रमांक एम.एच.19 सी.के. 4765) ची 26 मार्च रोजी चोरीस गेल्याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल होता.

नंबरप्लेटचा संशय आल्याने उघडकीस आला गुन्हा
जळगाव एमआयडीसी पोलिसांना एकाकडील दुचाकीच्या नंबरबद्दल संशय आल्यानंतर त्यांनी संपूर्ण तपासणी केली असता ही दुचाकी किनगावातून चोरी झाल्याचे उघड झाले तर संबंधिताने ही दुचाकी किनगाव येथील शेख जावेद शेख जहाँगीर व शेख हारून शेख जलाल यांच्याकडून खरेदी केल्याची माहिती दिल्यानंतद दोघांना यावल पोलिसांनी अटक केली. दोघा संशयीतांना गुरूवारी यावल न्यायालयात प्रथमवर्ग न्या.एम.एस.बनचरे यांच्या समोर हजर केले 31 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास सहा.फौजदार विजय पाचपोळ करीत आहेत.