किनगावात आठवडे बाजारातून मोबाईल लंपास

0
यावल :- तालुक्यातील किनगाव येथे आठवडे बाजारातून तक्रारदार हिरामण पाटील (रा.किनगाव) यांच्या मालकिचा 14 हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.  27 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली तर रविवारी रात्री उशिरा या संदर्भात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आठवडे बाजाराच्या दिवशी भोंगर्‍या बाजार असल्याने गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने मोबाईल लांबवला. तपास पोलीस नाईक सुनील तायडे करीत आहेत.