यावल- तालुक्यातील किनगाव येथील प्रमोद रघुनाथ पाटील (39) यांनी 22 ऑगस्ट रोजी सकाळी 8.20 पूर्वी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या प्रकरणी प्रशांत भगवान पाटील (40, किनगाव) यांनी यावल पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार सुनील तायडे करीत आहेत.