किनगावात जुगार अड्ड्यावर धाड : 47 हजारांचा मुद्देमाल जप्त

0

यावल- तालुक्यातील किनगावातील एका जुगार अड्ड्यावर फैजपूर उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाकडून धाड टाकत तिघांना अटक केली तर तिघे पसार झाले. कारवाईत 47 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे, हवालदार राजेंद्र पाटील, सहाय्यक फौजदार शेख अजीज, संजीव चौधरी, शेख असलम, गणेश मनोरे, विकास सोनवणे, सुशिल घुगे, अविनाश चौधरी, दिलीप तायडे आदींच्या छापा टाकला. लेंडी नदीच्या काठी तडवी वाड्याजवळ सहा जण जुगार खेळत असताना पोलिसांना पाहताच तिघे पळाले तर तिघांना ताब्यात घेण्यात यश आले. खलिल सिराज तडवी, साहेबराव आधार महाजन व अजय साहेेबराव कोळी या तिघांना पकडण्यात आले तर गणेश दिलीप साळुंके, सुरेश हरचंद भोई व जयवंत उर्फ बाळासाहेब पाटील हे पसार झाले. रोख रकमेसह दोन मोबाईल व दोन दुचाकी मिळून 46 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अविनाश चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.