यावल- तालुक्यातील किनगाव खुर्दचे सरपंच भुषण पाटील यांच्या घरासमोर संशयीत आरोपी निलेश बारकू महाजन, सुभाष श्रावण पाटील, सागर लहू पाटील व राकेश श्रावण पाटील यांनी अशपाक शाह मजीत शाह यांना सोमवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली. यावेळी भांडण सोडवण्या करीता विजय साळुंके व राहुल बापू साळुंके हे गेल्यानंतर चौघा संशयीत आरोपींन अशपाकला मारहाण करण्यापासून थांबवल्याने या दोघांनाचं लोखंडी फायटरने तोंडावर व डोक्यावर जबर मारहाण केली. विकोपाला गेलेला वाद सोडवण्यासाठी पुढे आलेल्या उपसरपंच शरद अडकमोल यांना देखील वरील चौघांनी धक्काबुक्की केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी यांनी धाव घेतली. जखमींना यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. चारही आरोपंविरुद्ध विजय मधुकर साळुंके यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.