किनगावात पिता-पुत्राला मारहाण : सहा जणांवर गुन्हा

यावल : हळदीच्या कार्यक्रमातील महिलेचे फोटो तुझ्या मोबाइलमध्ये कसे आले, अशी विचारणा करत किनगावात एकास सहा जणांनी मारहाण केली. भांडण सोडवण्यास आलेल्या वडिलांनाही मारहाण झाली. या प्रकरणी येथील पोलिसांत दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण
किनगावातील उमेश भगवान धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धनगर यांची शेती असून तेथे काम करण्यासाठी महिला मजूर येतात. शनिवारी 10 वाजता त्यांच्याकडे कामाला येणार्‍या महिलेच्या पतीसह सुरेश हरचंद भोई, अमोल बापू साळूंके, बादल वसंत हरणे, रोहित उर्फ गोलू दिलीप साळुंके, राहुल बापू साळुंके व विजय उर्फ नाना मधुकर साळुंके हे सहा जण आले. उमेश धनगर तेव्हा ग्रामपंचायत चौकात थांबला असताना त्यास विचारणा केली की, हळदीच्या कार्यक्रमातील महिलेचे फोटो तुझ्याकडे कसे आले. धनगरने सांगितले की, हा माझा मोबाइल नाही, माझ्या पत्नीचा आहे. मी तिला विचारेल मात्र यावर समाधान न झाल्याने त्या सर्वांनी उमेश धनगर यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

सहा जणांविरोधात गुन्हा
सुरेश भोई याने बांबूच्या काठीने मारहाण केली तसेच धनगर याच्या पत्नीस शिवीगाळ करून तू ट्रॅक्टरवर जाशील तेव्हा तुला उडवून टाकीन, अशी धमकी दिली. उमेशचे वडील भगवान धनगर तेथे धावले. तेव्हा त्यांच्याही डोक्यावर दगड मारल्याने दुखापत झाली. त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास यावल पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार अजीज शेख, हवालदार नरेंद्र बागुले करत आहेत.