यावल : तालुक्यातील किनगाव येथे किरकोळ कारणाच्या संशयावरून दोेघांना चौकात पिता, पुत्र अशा पाच जणांनी लाठ्या-काठ्यांनी जबर मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेत एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी यावल पोलिसात दंगलीसह विविध कलामान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
किरकोळ कारणावरुन उफाळला वाद, पाच जणांविरुद्ध गुन्हा
शेख बशीर शेख नशीर (रा.किनगाव खुर्द) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्यांचा भाऊ शेख नजीर शेख नसीर (25) हा त्याची बहिण रेहानासोबत भाची उमेरा (वय एक) हिला दवाखान्यात उपचार्थ नेत असताना गावातील मच्छी बाजार चौकात संशयीत छबू नजीर तडवी, त्यांची मुलं सबदर तडवी, अजहर तडवी, इबा तडवी व शफी तडवी यांनी तु लोकांना असे सांगतो की तडवी लोकांकडून माझेे काहीचं होणार नाही, असे सांगत त्याला मारहाण करायला सुरुवात केली. फिर्यादी शेेख बशीर हा भांडण सोडवायला गेला असता त्याला देखील लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यात आली.