यावल : तालुक्यातील किनगाव येथील 40 वर्षीय शेतमजुराने राहत्या घरात सोमवारी दुपारी साडीने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. भगवान रघुनाथ पाटील (40) असे मयताचे नाव आहे. किनगाव खुर्द गावातील साईबाबा मंदिर परीसरात राहणारे भगवान रघुनाथ पाटील (40) हे पत्नी व मुलासह वास्तव्यास होते.सोमवारी पत्नी व मुलगा शेतात कामाला गेल्यानंतर भगवान पाटील हे घरी एकटेच असताना दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घराच्या छताच्या पडतीला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. पोलीस पाटील दिलीप साळुंके यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन केले. तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहेत. मयत भगवान पाटील यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, एक मुलगा असा परीवार आहे.