किनगावात 55 वर्षीय शेतमजुराची आत्महत्या

यावल : तालुक्यातील किनगाव खुर्द येथे एका बटाईने शेती कसणार्‍या 55 वर्षीय शेतमजुराने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. प्रकाश दगडू पाटील (55) असे मयताचे नाव आहे. किनगाव खुर्द येथील रहिवासी प्रकाश पाटील हे बटाईने शेत कसायचे व आपला उदरनिर्वाह करायचे. मंगळवारी सायंकाळी ते इचखेडा रस्त्यावरील त्यांनी बटाईने केलेल्या धुडकू नाफडे यांच्या शेतात गेले होते व रात्री 10 वाजेपर्यंत घरी न आल्याने शोध घेतल्यानंतर शेतविहिरीजवळ त्यांच्या अंगावरील कपडे व पादत्राणे आढळली. विहिरीत पाहणी केली असता त्यांचा मृतदेह आढळून आला. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन केले. दुपारी किनगावात त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंतसंस्कार करण्यात आले. यावल पोलिसात जगन पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहेत.