किनगाव ग्रामपंचातीच्या सेवानिवृत्त कर्मचार्‍याचे उपोषण

0

यावल- तालुक्यातील किनगाव बु.॥ ग्रामपंचायतचे सेवानिवृत पाणीपुरवठा कर्मचारी यांना सेवानिवृतीनंतर मिळणारे फंडाची रक्कम व थकीत पगार न मिळाल्याने आपल्याला न्याय मिळावा या मागणीला घेवुन त्यांनी किनगाव बु॥ ग्रामपंचायत समोर आपले बेमुदत उपोषण सुरू केले आहे. किनगाव बु॥ ग्रामपंचायत मध्ये साहेबराव भगवान साळुंके हे 1985मध्ये पाणीपुरवठा कर्मचारी म्हणुन सेवेत लागले होते. 33 वर्ष सेवा दिल्यानंतर ते 2017ते 2018च्या कालावधीत ते प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत झाले होते. साहेबराव भगवान साळुंके यांना सेवानिवृत नंतर मिळणारी ग्रॅज्युरीटीची रक्कम एक लाख 18 हजार 404 रुपये, प्रा.फंडाची रक्कम 88 हजार 808 रुपये आणी थकीत पगारची रक्कम एक लाख 53 हजार 300 रुपये अशी एकूण रक्कम तीन लाख 42 हजार 509 रुपये आपल्या हक्काची रक्कम तत्काळ मिळावी यासाठी आपण सरपंच, ग्रामविकास अधिकारी, यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना तक्रार निवेदने दिली मात्र उपयोग न झाल्याने त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. त्यांच्या या बेमुदत उपोषणाला महासंघाचे राज्य सचिव अमृत राज महाजन यांनी उपोषणस्थळी भेट देवुन आपला पाठींबा दर्शविला. त्याचप्रमाणे पंचायत समितीचे माजी सदस्य व शिवसेना पदाधिकारी रवींद्र निंबा ठाकुर यांनी भेट दिली.