किनगाव-चिंचोली रस्त्यावर हाणामारी ; दोघे जखमी

0

यावल- गुरे चराईच्या वादातून किनगाव-चिंचोली रस्त्यावर हाणामारी झाल्याने दोघे जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली. संग्राम राजू काठेवाडी (रा.सुरेंद्र नगर, गुजरात, ह.मु.कासारखेडा ता.यावल) यांच्या फिर्यादीनुसार बुधवारी सकाळी 9.30 वाजता ते व त्यांचा भाऊ कन्हया काठेवाडी हे किनगाव-चिंचोली रस्त्यावर हिरालाल शिंपी यांच्या शेताजवळ गुरे चराई करत होते. यावेळी देवा जाला काठेवाडी, लाला देवा काठेवाडी व माला देवा काठेवाडी (रा.चिंचोली शिवार) यांनी आमच्या भागात गुरे चराईसाठी का आणली? असे विचारत मारहाण केली. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार सुनील तायडे, विकास सोनवणे करत आहे.