किनगाव येथे इंग्लिश स्कुलच्या वतीने जागतिक आदिवासी दिन विद्यार्थ्यांच्या सहभागाने मोठया उत्साहात साजरा
यावल (प्रतिनीधी ) तालुक्यातील किनगाव गावापासुन डोणगावकडे जाणाऱ्या मार्गावरील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल येथे जागतिक आदिवासी दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील ,उपमुख्याध्यापिका सौ.राजश्री सुभाष अहिराव, क्रिडा शिक्षक दिलीप बिहारी संगेले,मिलिंद भालेराव आदिंनी थोर क्रांतीकारी भगवान बिरसा मुंडा,तंट्या भिल व खाजा नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . यावेळी आदिवासी दिनाच्या निमित्ताने रॅलीचे आयोजन ही करण्यात आले होते .या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी आदिवासी पोशाख परिधान करून तसेच विविध आदीवासी लोकगीतांवर नृत्यांच्या माध्यमातून आदिवासी बाधवांच्या रूढी परंपरा यांचे दर्शन मांडले तसेच नाटिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हसवत नशा मुक्तीचा संदेश ही दिला रॅलीची सुरुवात शाळेतील मुख्य इमारतीपासून प्रवेशद्वारा पर्यंत तर प्रवेशद्वारा पासून नवीन व्यासपिठावर विविध कार्यक्रम घेऊन रॅलीची सांगता करण्यात आली. या कार्येक्रमात नृत्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील सचिव मनीष पाटील, संचालक सौ.पुनम मनिष पाटील, मुख्याध्यापक अशोक पाटील, उपमुख्याध्यापिका सौ.राजश्री सुभाष अहिरराव यांनी कौतुक केले व जागतिक आदिवासी दिनानिमीत्त शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक हर्षल मोरे,योगीता बिहारी,देवयानी साळुंखे, मिलींद भालेराव,भावना चोपडे, प्रतिभा धनगर,गोपाल चित्ते, पवनकुमार महाजन, सुहास भालेराव, प्रतिक तायडे,पुजा तायडे,सोनाली कासार,प्रतिभा पाटील, बळीराम कोतवाय,शेखर पाटील,वैशाली चौधरी,योगीता सावडे,रोहित बावीस्कर, दिलीप संगेले,मयुरी बारी,तिलोत्तमा महाजन,सोनाली वाणी,रत्ना बाविस्कर,वैशाली बडगुजर, बाळासाहेब पाटील यांनी परिश्रम घेतले.