किनगाव येथे चौघांची विवाहितेसह दोघा मुलांना मारहाण : यावल पोलिसात गुन्हा

In Kingaon, four people beat up a married woman and two children : a case in Yaval police यावल : तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथे किरकोळ कारणावरून चौघांनी एका कुटुंबातील तिघांना मारहाण केली व अश्लील शिवीगाळ करून घर जाळण्याची धमकी दिली. या प्रकरणी यावल पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
किनगाव बुद्रुक, ता.यावल येथील कृष्णा अरुण कोष्टी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते शेतात गेले असता त्यांच्या घरी त्यांची पत्नी आशा कृष्णा कोष्टी, मुलगी देवयानी कृष्णा कोष्टी व मुलगा लकी कृष्णा कोष्टी हे घरीच होते. त्यांच्या घरासमोरील आमीन कालू तडवी, अलाउद्दीन कालू तडवी, नशिबाबाई कालू तडवी व कालू सांडू तडवी या चौघांनी येऊन त्यांना किरकोळ कारणावरून अश्लील शिवीगाळ केली व मारहाण करीत तू आमच्या घराच्या शेजारी कशी राहते व तुझे घर आम्ही जाळून टाकू अशी धमकी दिली. या प्रकरणी चौघांविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.