किनगाव येथे दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त

0

यावल- तालुक्यातील किनगाव येथील दोन गावठी दारूच्या भट्ट्या यावल पोलिसांनी शुक्रवारी सकाळी नष्ट केल्या. या कारवाईत 600 लिटर कच्चे रसायन, 40 लिटर गावठी दारू असा सुमारे 25 हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
शुक्रवारी पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी यांच्यासह हवालदार सुनील तायडे, विकास सोनवणे, विजय परदेशी यांच्या पथकाने किनगाव जवळील लव्हाळ नाल्याच्या काठावर कारवाई केली. महिलांकडून दोन भट्ट्या लावून गावठी दारू गाळली जाते, या माहितीनुसार ही कारवाई झाली. दरम्यान, पोलिसांना पाहून त्या महिलांनी पळ काढला. यानंतर पथकाने एका भट्टीवरील 300 लिटर रसायन व 30 लीटर दारू आणि दुसर्‍या भट्टीवरील 300 लिटर रसायन आणि 10 लिटर दारू व साहित्य असा एकुण 25 हजारांचा मुद्देमाल जागेवर नष्ट केला. याप्रकरणी दोन अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.