यावल। तालुक्यातील किनगाव बु. गावात प्रभाग क्रमांक 5 मध्ये गेल्या आठवड्या भरापासुन पिण्याचे पाणीच मिळत नसल्याने सप्तंत महिलांनी बुधवार 3 रोजी थेट ग्रामचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला विषेश म्हणजे हा प्रभाग सरंपच ज्योती महाजन याचा असल्याने नागरिक आधिकच संप्तत झाले.
आश्वासनानंतर महिला फिरल्या माघारी
येथे महाजन वाड्यासह प्रभाग 5 मध्ये नळांना पाणीच येत नाही. सरपंच ज्योती महाजन या देखील याच प्रभागातील रहिवासी असल्याने त्यांना अनेक वेळा रहिवाशांनी तोंडी तक्रारी केल्या मात्र समस्या सुटत नसल्याने नागरीकांचा संतापाचा बांध फुटल्याने माहिलांनी हंडा मोर्चा काढत पंचायत गाठली तेथे सरपंचांना बोलविण्याच आग्रह धरला मात्र सरपंच पती अशोक महाजन यांसह ग्रामपंचायत सदस्य डी.एन. महाजन यांनी पचायंतीत येवुन मोर्चेकर्यांची समजुत काढली तर पिण्याच्या पाण्यासह तुबलेल्या गटारी, परिसरातील स्वच्छेतेचा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला. यावेळी मुक्ताबाई महाजन, प्रमिला महाजन, शोभा महाजन, रमेश महाजन, गंगाराम महाजन, सदस्य डी.एन. महाजन, आनंदा महाजन, प्रमोद महाजन, सरला महाजन, सुरेश महाजन, किरण महाजन, शोभा महाजन यांसह मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती होती. तर मुख्य लाईनवरिल दिलेले नळ कनेक्शन बंद करुन प्रभागात पाणी पुरवठा पुर्ववत सुरु होईल या आश्वासनानंतर महिला माघारी फिरल्या.