किनगाव येथे संदलमध्ये घडले एकात्मतेचे दर्शन

0

यावल- हजरत मलंग शाह बाबा यांच्या संदलनिमित्त तालुक्यातील किनगाव येथे राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडले. सोमवारी येथील मुख्य चौकात या संदल मिरवणुकीचे सर्वधर्मीय बांधवांच्या वतीने स्वागत करण्यात आले तर पुष्पवृष्टी करून उपस्थितांचा सन्मान करण्यात आला. दर्ग्यावर मान्यवरांच्या हस्ते रात्री साडे आठ वाजेला संदल चढवण्यात आला. किनगाव गावातील चुंचाळे रस्त्यावर हजरत मलंग शाह बाबा यांचा दर्गा आहे. या दर्ग्यावर सालाबादाप्रमाणे सोमवारपासून दोन दिवशी यात्रा उत्सव सुरू झाला असूनप सोमवारी दुपारी तीन वाजेपासून विविध कला पथक व वाद्यवृंदांद्वारे संदलची मिरवणूक काढण्यात आली.

यांनी केले संदल मिरवणुकीचे स्वागत
मुख्य चौकात या संदलच्या मिरवणुकीचे जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष आर.जी.पाटील, पंचायत समितीचे उपसभापती उमाकांत पाटील, किनगाव सरपंच टिकाराम चौधरी, उपसरपंच लतीफ तडवी, छोटू मिस्तरी, लुकमान तडवी, सफदर तडवी, खलील तडवी, संजय गांधी योजनेचे माजी अध्यक्ष खलील शाह, संजय पाटील, डॉ.योगेश पालवे, भीमराव साळुंखेसह मान्यवरांनी संदल मिरवणुकीचे स्वागत केले. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मलंगशाह बाबांच्या दर्ग्यावर संदल चढवण्यात आली.