किनगाव सरपंचांची बिनविरोध विनवड

0

ग्रामपंचायत निवडणूक; यावल तालुक्यात 12 सदस्य बिनविरोध

यावल: तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदाकरीता माघारी नंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यात किनगाव खुर्द सरपंच पदावर भूषण नंदन पाटील हे बिनविरोध तर पाच ग्रामपंचायतीत 12 सदस्य बिनविरोध झाले माघारीच्या दिवशी तब्बल सरपंच पदावरून 12 तर सदस्य पदावरून 56 उमेदवारांनी माघार घेतली. आता सहा सरपंच पदा करीता 17 तर सदस्यांच्या 54 जागे करीता 122 उमेदवार रिंगणात आहे. तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणुकीत माघारीच्या शेवटच्या दिवशी किनगाव खुर्द ग्रामपंचायत अधिक चर्चेत राहिली. यात प्रामुख्याने सरपंच पदाकरीता रिंगणात असलेल्या सहा उमेदवारांपैकी पाच उमेदवारांनी शेेवटच्या क्षणाला माघार घेत लोकनियुक्त सरपंच बिनविरोध करीत नवा पायंडा रोवला. त्यात किनगाव खुर्द ग्रामपंचायतीत सतत 17 वर्ष सरपंच पदावर राहत गावाच्या विकासाकरीता निस्वार्थ कार्य करीत राजकारणापासून लांब झालेले शुक्राम व्यकट पाटील यांचे नातू भुषण नंदन पाटील यांना सरपंचपद सर्वानुमते देण्यात आले तर गावातील सदस्यांच्या 11 जागे पैकी एक जागा रिक्त तर उर्वरीत पाच जागा देखील बिनविरोध झाल्या आहे तसेच गाडर्‍या दोन, गिरडगाव तीन, बोराळे एक व बोरखेडा खुर्द एक अशा एकूण 12 सदस्यांच्या जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर आता सरपंचपदा करीता सहा जागेत गाडर्‍या, गिरडगाव व बोराळेत सरळ लढत तर साकळी व म्हैसवाडीत तिरंगी आणि बोरखेडा खुर्द ला पाच जण सरपंच पदाकरीता रिंगणात आहेत.

सरपंच पदाच्या लढती अशा
साकळी – सुषमा विलास पाटील, सुनीता सचिन चौधरी व संध्या गणेश माळी.
गाडर्‍या- सेफाबाई भरत बारेला व पुष्पाबाई प्रताप बारेला.
गिरडगाव – अलका मधुकर पाटील व शोभा ज्ञानेश्वर पाटील.
बोराळे – पुष्पा पितांबर चौधरी व वंदना विनोद चौधरी.
म्हैसवाडी – सविता ज्ञानेश्वर कोळी, निलिमा प्रकाश चौधरी व रत्ना सुरेश मानेकर.
बोरखेडा खुर्द – इकबाल तडवी, जमशेर तडवी, राजू गंभीर तडवी, समशेर तडवी व राजु बाबू तडवी

बिनविरोध सदस्य असे- हमीदाबी कडू पिंजारी, जरीना जुम्मा तडवी, सीमा यशवंत पाटील, साबीर जमशेर तडवी, राजमाला विजय सपकाळे.