जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील किनोद येथे विद्युत सहायकाला बाप व मुलाने मारहाण केल्यामुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किनोद (ता. जळगाव) येथे चार ते पाच घरांमधील वीजपुरवठा खंडित झालेला होता. याबाबत ग्रामपंचायतीचे शिपाई दिलीप बनसोडे यांनी विद्युत सहायक किशोर वना जगताप यांना मोबाइलव्दारे संपर्क साधून कळवले. त्यानंतर जगताप हे त्यांचा सहायक रामदास सोनवणे यांच्यासह किनोद येथे गेलेले होते. तेथे जाऊन दुरुस्ती करीत असताना छोटू शांतीलाल सपकाळे व त्याच्या मुलाने विद्युत सहायकाला शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरण तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.