भुसावळ प्रतिनिधी दि 28
तालुक्यातील फेकरी तोल नाका, खुशबू हॉटेलच्या पाठीमागे फिर्यादी (ता. २५) रोजी सकाळपासून मैत्रीणकडे थांबले. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मैत्रीण सोबत असतांना भुसावळ मध्ये राहणारे तीन इसमांनी किन्नरचे धारदार शस्त्राने केस कापून लाठ्या काठ्यांनी व लोखंडी रॉडने हल्ला केल्या प्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, अश्फाक जाकीर बागवान उर्फे आम्रपाली (ता. २५) रोजी सकाळपासून मैत्रीण नुरी शेख राहणार फेकरी तोल नाका, खुशबु हॉटेल पाठीमागे थांबली होती. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास फिर्यादी ही तिची मैत्रीण नुरी सोबत असतांना भुसावळ मध्ये राहणारे संशयित आरोपी दानिश शेख, बाबा काल्या व सोनू शेख सोबत तीन अनोळखी इसमांसोबत तेथे आला. त्यांनी फिर्यादीशी “तू मुस्लिम किन्नर ची बदनामी केल्याने मारहाण केली. सदरील मारहाणीत फिर्यादी जखमी झाल्याने बाबा काल्या (पूर्ण नाव माहीत नाही) याने डोक्यावरील केस कापले. व येथून निघून गेले. त्यानंतर दानिश शेख यांनी त्यांच्या हातातील लोखंडी रॉडने दोन्ही पायावर मारले तर बाबा काल्या व सोनू शेख यांनी त्यांच्या हातातील लाठ्या- काठ्यांनी मारहाण केली म्हणून अश्फाक जाकीर बागवान उर्फ आम्रपाली याने तालुका पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोहेकॉ. योगेश पालवे करीत आहे.