किन्हवलीत पावसात विसर्जन सोहळा

0

किन्हवली । किन्हवली परिसरातील शेणवे, डोळखांब, अल्याणी, शेंद्रूण, सोगाव परिसरातील 12 दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. यथासांग आरत्या व उत्तरपूजा करून गणेशमूर्तींचे गावशेजारील नदी, ओढे व हौदात विसर्जन करण्यात आले. किन्हवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच आजूबाजूच्या 13 सार्वजनिक व 500 घरगुती मूतीर्र्चे विसर्जन शांततेत पार पडले.

मिरवणुकीत डॉल्बी लावल्यास कायदेशीर कारवाई होईल या भीतीने ढोल ताशा, बॅजो लावून व भजन करतच गणरायाला निरोप दिला. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याने विसर्जन करताना भक्तांची धांदल उडाली.