भुसावळ : तालुक्यातील किन्ही शिवारात गावठी दारू भट्टी सुरू असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करीत 91 हजार 900 रुपये किंमतीचे गावठीचे रसायन नष्ट केले. ही कारवाई शनिवारी दुपारी 1.45 वाजेच्या सुमारास करण्यात आली. किन्ही शिवारात नितीन चौधरी यांच्या शेताजवळ नाल्यात सार्वजनिक ठिकाणी अन्सार रशीद गवळी (रा.कन्हाळा) हा गावठी हातभट्टी दारू गाळण्याची भट्टी रचून दारू गाळत असताना पोलिसांनी कारवाई करीत 12 ड्रममधील दोन हजार 300 लिटर रसायण नष्ट करण्यात आले. आरोपीविरोधात तालुका पोलिस या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहा.निरीक्षक रुपाली चव्हाण, एएसआय सुनील चौधरी, हवालदार विठ्ठल फुसे, संदीप बडगे, गणेश राठोड, उमेश बारी, होमगार्ड उमेश सोनवणे, अमोल जयकर, जगदीश पाटील आदींच्या पथकाने केली.