जळगाव । शहरातील सुभाष चौकाजवळील गांधी मार्केट जवळील दुधाच्या टपरीजवळ 13 मार्च रोजी 4.30 वाजेच्या सुमारास एकाला हॉकीच्या लाकडी दांड्याने दोघांनी मारहाण करून डोक्याला गंभीर दुखापत केल्याची घटना घडली असून गंभीर रूग्णाला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. मात्र डोक्याला जबर मार बसल्याने त्यांनी बाजूलाच असलेल्या भंगाळे रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष चौकातील गांधी मार्केट जवळ चहाच्या टपरीवर काम करणारे रमेश श्रावण सोनवणे हे रोजच्या प्रमाणे चहाच्या टपरीवर चहा बनवत असतांना 13 मोर्च रोजी 4.30 वाजेच्या सुमारास टपरीजवळ सागर लिलाधर सैंदाणे आणि किरण लिलाधर सैंदाणे आल्यानंतर किरकोळ वाद झाला. मात्र थोड्या वेळात वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर दोघानी हॉकीच्या लाकडी दांडूक्याने सागर सैंदाणे आणि किरण सैदाणे यांनी रमेश सोनवणे यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. याला प्रतिकार करत असतांना हॉकी स्टिकचा फटका रमेश सोनवणे यांच्या डोक्याला लागल्याने गंभीर दुखापत झाली. जखमी आवस्थेत रमेश सोनवणे यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र रक्तस्त्राव जात होत असतांना त्यांना डॉ. ए.जी. भंगाळे यांच्या भंगाळे क्रिटीकल केअर सेंटरमध्ये आयसीयू विभागात दाखल करण्यात आले. दरम्यान सट्ट्याच्या वादातून हा वाद झाल्याचे बोलले जात होते. या घटनेची पोलिसात दोघांविरोधात तक्रार नव्हती.