जळगाव । घरघुती किरकोळ कारणावरून जामनेर येथील 23 वर्षीय तरूणाने राहत्या घरी कोणतेतरी विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडली असून उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, संजय प्रभाकर चव्हाण (वय-23) रा. जामनेर यांच्या घरात किरकोळ वाद झाला. संतापाच्या भरात घरात पडून असलेले शेतातील फवारणीचे पिकांचे विषारी औषध घेतले. संजयने विषारी औषध घेतल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर खासगी वाहनाने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. आता प्रकृती स्थिर आहे.