जळगाव । दारूच्या नशेत 35 वर्षीय महिलेच्या घरासमोर घाण फेकुन यावरून जाब विचारल्यावरून आरोपींसह इतर तीन जणांनी पिडीत महिलेच्या घरात घुसून मारहाण करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी चौघांविरोधात शनिपेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जोशीपेठेतील रहिवाशी विजया संदीप कापडणे (वय-35) यांच्या घरासमोर आरोपी किरण सुरेश कापडणे याने 5 एप्रिल रोजी रात्री 9.45 वाजेच्या सुमारास अंगणातील घरासमोर कचरा टाकला. कचरा टाकल्याने त्याचा जाब विचारला याचा राग आल्याने आरोपी किरण सुरेश कापडणे, सरला किरण कापडणे, गोलु किरण कापडणे, गणेश किरण कापडणे सर्व रा. जोशी पेठ यांनी विजया कापडणे यांच्या घरात घुसून त्यांच्या डोक्याचे केसांची ओढताण करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य शिवीगाळ व मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. विजय कापडणे यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिसात चौधांविरोधात भाग 5, गुरनं 15/2018 भादवी कलम 452, 354,323,504,294 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो.हे.कॉ. रविंद्र पाटील करीत आहे.