किरकोळ कारणावरून विवाहितेचा छळ : सहा जणांविरोधात गुन्हा

Harassment of married woman in Muktainagar: Crime against six persons including husband मुक्ताईनगर : शहरातील सासर व नंदुरबार येथील विवाहितेचा सासरच्यांनी 8 डिसेंबर 2020 ते 12 फेब्रुवारी 2022 किरकोळ कारणावरून छळ केला. या प्रकरणी पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी मनीषा इशान शाह (28, वाणी, रा.सुराणा नगर, मुक्ताईनगर) यांच्या तक्रारीवरून पती इशान मनोजकुमार शाह, मनोजकुमार कन्हैय्यालाल शाह, सुनीता मनोजकुमार शाह, अमी मनोजकुमार शाह, महेंद्र कन्हैय्यालाल शाह (सर्व रा.देसाईपुरा, नंदुरबार), दीपेश श्राफ (इंदिरा कॉलनी, बर्‍हाणपूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक तडवी करीत आहेत.