किरकोळ कारणावरून सहस्त्रलिंगमध्ये तुफान हाणामारी

रावेर : घराच्या बाजुला दुचाकी का लावली ? या कारणावरुन तालुक्यातील सहस्रलिंग येथे शुक्रवारी रात्री तुफान हाणामारी झाली. या प्रकरणी नऊ आरोपींविरूद्ध रावेर पोलिस स्थानकात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तुफान हाणामारीने खळबळ
घराच्या बाजुला दुचाकी का लावली? या कारणावरुन सहस्रलिंग येथे तुफान हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी सुनील जाधव (23, सहस्त्रलिंग) यांच्या फिर्यादीवरुन संशयीत आरोपी सताब मोहिते, यशवंत मोहिते, हरदेव मोहिते (तिघे रा.सहस्त्रलिंग) तसेच हजाब मोहिते, शाहू मोहिते, बसुदेव मोहिते (लालमाती) तसेच सुभाष बेलदार, संतोष बेलदार, संतोष चव्हाण (नेपानगर) या नऊ जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेबूब तडवी तपास करीत आहे.