भुसावळ- किरकोळ कारणावरून उफाळलेल्या वादात तिघांनी एकास मारहाण केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल ग्रीन व्हयूवमध्ये शनिवारी रात्री एक वाजेच्या सुमारास तीन जणांनी अब्दुल हनीफ अ. गफूर कुरेशी यांच्या डोक्यावर मारहाण केली. या प्रकरणी सागर उर्फ डींग्या, हर्षल जाधव, कृणाल करोसिया यांनी कुरेशी (रा. पूजा कॉम्प्लेक्स, भुसावळ) यांच्याविरुद्ध कुरेशी यांनी मंगळवारी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय गुळींग करीत आहेत.