किरकोळ भांडणातून एकमेकांवर चाकू हल्ला

0
सात जणांवर गुन्हा दाखल
चाकण : चाकण एमआयडीसीमधील एका कंपनीत  झालेल्या भांडणाचा राग मनात धरून कं पनीच्या बाहेर आल्यानंतर सार्वजनिक ठिक ाणी धारदार चाकूच्या साह्याने एकमेकांवर ह ल्ला करण्यात आला. ही घटना खराबवाडी (ता.  खेड) येथे मंगळवारी (दि.18) रात्री  साडेदहाच्या सुमारास घडली. यामध्ये तीनजण  जखमी झाले असून परस्परविरोधी तक्रारीवरू न सातजणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे  दाखल करण्यात आले आहेत. विजय इंगोले,  अमोल अशोक इंगोले व विरबाजी उर्फ बाजी  बाबा चव्हाण अशी यामध्ये जखमी झालेल्या  तिघांची नावे आहेत. अमोल अशोक इंगोले  (वय 26 वर्षे, रा. चाकण) यांनी दिलेल्या  फिर्यादीवरून विरबाजी बाबा चव्हाण (रा.  दावडमळा, चाकण), अक्षय खरमारे (रा.चाक ण), अक्षय पाचपुते (रा. आंबेठाण चौक) व  गणेश शिंदे (पुर्ण पत्ता माहीत नाही ) अशा  चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तर विरबाजी उर्फ बाजी बाबा चव्हाण (वय 22  वर्षे) यांच्या फिर्यादीवरून अमोल अशोक  इंगोले, अशोक इंगोले, नितीन उटकर (तिघेही  रा. चाकण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  खराबवाडी (ता. खेड) येथील विडंस्ट्राँग कं पनीत झालेल्या किरकोळ भांडणातून रात्रीच्या  वेळी ही तुंबळ हाणामारी झाली. लोखंडी चाकू च्या साह्याने एकमेकांच्या पोटावर गंभीर  जखमा करण्यात आल्या असून चाकण पोलीस  तपास करीत आहेत.