जळगाव : शहरातील सुप्रिम कॉलनीत किरकोळ कारणावरून तरूणाला शिवीगाळ करण्यात आली तसेच डोक्यावर विट मारून फेकण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
आकाश अशोक निमसे (24, सुप्रीम कॉलनी) हा तरुण आपल्या परीवारासह वास्तव्यास असून खाजगी वाहनावर चालक आहे. सोमवार, 13 जून रोजी रात्री 11 वाजता आकाश हा त्याचा मित्र प्रवीण याला सोडण्यासाठी सुप्रिम कॉलनीतील प्रेमाबाई शाळेजवळ आला. त्यावेळी तिथे बसलेला प्रेमचंद भोई म्हणाला की, तू इथे का आला त्यावर आकाशने मित्राला सोडण्यासाठी आलो असल्याचे सांगितले व याचा राग आल्याने प्रेमचंद भोई, बाळू जैन (दोन्ही सुप्रीम कॉलनी जळगाव) यांनी शिवीगाळ करून मारहाण केली तर एकाने आकाशच्या डोक्यावर विट मारून गंभीर दुखापत केली. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याबाबत आकाशच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी प्रेमचंद भोई आणि बाळू जैन (दोन्ही रा.सुप्रिम कॉलनी, जळगाव) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक सचिन पाटील करीत आहे.