किरकोळ वादातून पत्नीची केली हत्या : शिरपूर तालुक्यातील धक्कादायक घटना

Wife killed for refusing to brush her teeth : Incident in Shirpur Taluka शिरपूर : दात घासण्यासाठी तपकीर मागितल्यानंतर पत्नीने ती न दिल्याने संतापाच्या भरात पतीने पत्नीच्या डोक्यात कुर्‍हाड मारल्याने पत्नीचा मृत्यू झाला. शिरपूर तालुक्यातील नटवाळे येथे गुरुवारी रात्री घडली. गीता रामलाल पावरा असे मृत महिलेचे आहे तर रामलाल पवार असे आरोपी पतीचे नाव आहे.

परीसरात उडाली खळबळ
ही घटना कळताच परीसरातील नातेवाईकांनी शिरपूर उपरुग्णालयात गीताबाई पावरा हिला दाखल केले डॉक्टरांनी तपासणी केली असता तिला मृत घोषित करण्यात आली. रामलाल हजार्‍या पावरा (50) असे आरोपी पतीचे नाव आहे.