पहूर : पहूरपेठ येथे किरकोळ वादातून एका व्यावसायीकावर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली. राहुल नाना भोंडे असे जखमी व्यावसायीकाचे नाव आहे.
किरकोळ वादातून चाकू हल्ला
पहूरपेठ ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलात राहुल नाना भोंडे यांचे दुकान असून किरकोळ वादावरून एकाने भोंडे यांच्यावर अचानक चाकूहल्ला केला. यात भोंडे हे गंभीर जखमी झाले. या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या हल्ल्यात राहुल भोंडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.