किरकोळ वादातून साकरीत एकास मारहाण

0

भुसावळ । तालुक्यातील साकरी येथे किरकोळ वादातून एकास मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मनोज शालिग्राम सपकाळे (36) यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी भानुदास बाविस्कर, जितेंद्र बाविस्कर, महेंद्र बाविस्कर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

5 रोजी बारा ते साडेबारा दरम्यान घराच्या सांडपाण्याचा पाईप टाकण्याच्या कारणावरून वाद होवून संशयीत आरोपींनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तपास उपनिरीक्षक काझी करीत आहेत.