जळगाव : भागीरथ इंग्लिश स्कुलचे शिक्षक किरण पाटील यांना ओबीसी विद्यार्थी, शिक्षक पालक विकास असोसिएशन धुळे यांच्यातर्फे महात्मा ज्योतीराव फुले व शिक्षक दिना निमित्ताने नाशिक विभागीय गुरुगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे, विलासराव पाटील, अॅड. ललिता पाटील, संभाजी पगारे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यांच्या यशाबद्दल मुख्याध्यापिका आशा चौधरी, उपमुख्यापिका नेहा जोशी, पर्यवेक्षक किशोर राजे, कला शिक्षक एस.डी. भिरुडे तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी त्याचे अभिनंदन केले.