जळगाव । भगीरथ इंग्लिश स्कूलमधील अष्टपैलू, विद्यार्थी प्रिय व गुणी शिक्षक किरण विठ्ठल पाटील यांना त्यांनी केलेल्या साहित्यीक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ केंद्रीय प्रचार कार्यालय, गुरुकुंज आश्रम मोझरी जि. अमरावती यांच्या तर्फे डॉ. बाबासाहेब आंबबेडकर साहित्य रत्न पुरस्कार नागपुरचे न्यायाधीश आनंदजी भडके, मुकेश सोनवणे, गोपाल दर्जी, जिल्हा प्रचार अधिकारी हरीचंद्र बाविस्कर व इतर मान्यवरांच्या हस्ते देवून किरण पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
या आधी ही किरण पाटील यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्यामुळे जिल्हास्तरीय, विभागस्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय असे विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका आशा चौधरी, उपमुख्याध्यापिका नेहा जोशी, पर्यवेक्षक किशोर रोजे, ज्येष्ठ कला शिक्षक एस.डी. भिरुड यांनी किरण पाटील यांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले.