किरण लाड यांची निवड

0

नागोठणे : किरण रघुनाथ लाड यांची केएमजी विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. लाड नागोठणे पत्रकार संघाचे उपाध्यक्ष असून निवडीबद्दल पत्रकार संघाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. मंडळाचे हे 56 वे वर्ष असून कानिफनाथ मंदिरात घेण्यात आलेल्या बैठकीत 2017 सालासाठी गणेशोत्सव समिती नव्याने गठीत करण्यात आली. यावेळी संतोष नागोठणेकर उपाध्यक्ष, मोहन नागोठणेकर, सुनील लाड आणि तुकाराम खांडेकर कार्याध्यक्ष, रविंद्र वाजे सचिव, चंद्रकांत लाड सहसचिव, दीपक वाडेकर खजिनदार, संतोष वादळ सह खजिनदार, विजय नागोठणेकर, बाळू रटाटे आणि जगदीश चौलकर कार्यवाहक अशी नियुक्ती करण्यात आली आहे.