Gutkha Worth 31,000 Seized From a Grocery Store in Jam Mohalla Area Of Bhusawal : Accused Arrested भुसावळ : शहरातील जाम मोहल्ला भागातील टी.एच.खान कारखान्याजवळील एका किराणा दुकानातून 31 हजार 500 रुपयांच्या विमल गुटखा बाजारपेठ पोलिसांनी सोमवार, 5 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता जप्त केला. याप्रकरणी संशयीताला अटक करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळातील जाम मोहल्यात विमल गुटखा विक्री होत असल्याची माहिती बाजारपेठ ठाण्याचे पोलिस कर्मचारी जावेद शहा यांना मिळाली होती. निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या किराणा दुकानात छापा टाकून 31 हजार 500 रुपयांचा सुगंधित तंबाखूजन्य विमल गुटखा जप्त केला.
बाजारपेठ पोलिसात गुन्हा
याप्रकरणी आसिफ खान नासीर खान याला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी जावेद हकीम शहा यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र सपकाळे हे करीत आहे.