किर्गीओस, वावरिंका, पोट्रो दुसर्‍या फेरीत

0

पॅरिस । फ्रेंच ओपनच्या पहिल्या फेरीत दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा निक किर्गीओस, अर्जेन्टिनाचा जुआन मार्टिन डेल पोट्रो, युपेनची इलिना स्विटोलिना, मॅडिसन कीज, व्हर्डास्को, वावरिंका, इस्टोमिन यांनी फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. अलेक्झांडर क्हेरेव्ह, सॅम क्वेरी, जोहाना कोन्टा, मोनिका बार्थेल यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.

18 व्या मानांकित किर्गीओसने दुखापतीची चिंता व भावनांवर नियंत्रण ठेवत जर्मनीच्या फिलिप कोलश्रेबरचा 6-3, 7-6, 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.