किलीयन जॉर्नेटची 36 तासांमध्ये एव्हरेस्ट चढाई

0

न्यूयॉर्क। जगातील सगळ्यात उंच असलेले माऊंट एव्हरेस्ट हे शिखर स्पॅनीश तरुणाने 26 तासात सर केले. विशेष म्हणजे त्याने फिक्स दोरी आणि ऑक्सिजनची बॉटलही न घेता हे शिखर सर करत नवा विक्रम प्रस्थापीत केला आहे. किलीयन जॉर्नेट असे त्या विक्रमवीराचे नाव आहे.

किलीयनने 2016 च्या सप्टेंबरमध्ये एव्हरेस्ट सर केला होता. त्यानंतर त्याने नॉर्थ भागाकडून एव्हरेस्टवर चढाई केली. यात त्याने 8848 मीटर उंच असलेले एव्हरेस्ट पारंपरिक पद्धतीने चढून सर केले. तो सर्वात कमी वेळेत विना ऑक्सीजनचा एव्हरेस्ट सर करणारा विक्रमवीर ठरला आहे. साधारण ट्रेकरला विना ऑक्सीजन एव्हरेस्ट सर करायला 3 ते 4 आठवड्यांचा कालावधी लागतो. मात्र, किलीयनने 26 तासात एव्हरेस्ट सर केला. त्याच्यापेक्षाही अर्ध्या वेळेत एव्हरेस्ट सर केल्याचा दावा काही ट्रेकर्ससह शेरफांनी केला आहे. मात्र, त्याचे कोणतेही अधिकृत कागदपत्र उपलब्ध नसल्याची माहिती पुढे आल्याने त्यांचा दावा फोल ठरला आहे.

अतिशय खडतर मार्गावरून एव्हरेस्ट चढण्यातील आनंद काही वेगळाच असल्याची प्रतिक्रिया किलीयनने दिली आहे. यावेळी बोलताना तो म्हणाला की, मी खूप आनंदी आहे. एव्हरेस्टवर मला अप्रतिम सूर्योदय पाहायला मिळाला. 7700 मीटरपर्यंत मी अतिशय वेगाने चढाई केली. मात्र, त्यानंतर पोटात दुखायला लागल्याने माझा वेग मंदावल्याची माहितीही त्याच्या वतीने प्रवक्ता लॉरा फ्रांटने दिली.