चाळीसगाव । सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड परीसरातील किल्ले पडका येथे 26 नोव्हेंबर रोजी दुर्गसंवर्धन मोहीम राबविण्यात येणार आहे. 26 नोव्हेंबर 2017 रविवार रोजी सकाळी 9 वाजता सुरु होणार्या मोहीमेत किल्यावरील कचरा गोळा करणे, किल्याची पाहणी करून किल्यावरील अनेक वास्तूंचा आढावा घेऊन त्यांची नोंद करण्यात येणार असुन 26 नोव्हेंबर 2008 मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. त्यानंतर ध्वजपूजन करण्यात येणार आहे.
संभाजीनगर जिल्ह्यातील देवगिरी हे यादवांच्या राजधानीचे ठिकाण होते. त्यामुळे त्याकाळात राजधानीकडे येणार्या मार्गांवर टेहळणीसाठी किल्ल्यांची साखळी निर्माण करण्यात आली होती. यादवांचा पराभव झाल्यानंतर देवगिरीचे महत्व कमी झाले. त्यामुळे टेहळणीसाठी बनवलेल्या किल्ल्यांचे महत्वही कमी झाले व आडमार्गावर असल्यामुळे यातील काही किल्ले लोकांच्या विस्मरणात गेले. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेला पेडका किल्ला यापैकी एक आहे. अशी या किल्ले पेडका किल्ल्याची माहिती असुन मोहिमेत सहभागी होण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे (9763955716), विवेक रणदिवे (9423489489), पप्पु राजपुत, शरद पाटील, किरण घोरपडे, निलेश हमलाई यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.