चाळीसगाव। सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव आयोजित 6 ऑगस्ट रोजी तालुक्यातील कन्नड घाटात असलेल्या किल्ले मल्हारगड येथे दुर्गसंवर्धन व दिशादर्शक फलक लावने मोहीम आयोजीत करण्यात आली आहे. किल्ले मल्हारगड,चाळीसगाव (कन्नडघाट) येथे जाण्यासाठी रविवार 6 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 9.30 वाजता याठीकाणी जाणार्या इछुकांनी तहसील कार्यालय समोरील आर्यापोहार हॉटेल येथे उपस्थित राहून पुढे किल्ले मल्हारगडाच्या पायथ्याशी 10.10 वाजेपर्यंत पोहोचणार आहेत.
10.30 वाजता गड चढण्यास सुरुवात, 10.40 वाजता गडावर पोहोचल्यानंतर गडपूजन, 11:00 वाजेपर्यंत नियोजित कामच्या ठिकाणी, गडावर जाणार्या रस्तावर दिशादर्शक फलक लावणे. दुपारी 2:00 वाजता जेवण, जेवणानंतर किल्यावरील मातीखाली गेलेला भुयारी दरवाजा मोकळा करणार, ही मोहीम निशुल्क असुन या मोहीमेत दुचाकी व चारचाकी ने सहभागी होत असल्यास प्रवासात वाहने सांभाळून चालवावी. सोबत येतांना लागणारे विविध साहित्य आवाहन करण्यात आले आहे. मोहिमेत सहभागी होण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे (9763955716) शुभम चव्हाण, यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.