किल्ले लळींग येथे सापडली महादेवाची पुरातन पिंड

0

धुळे । किल्ले लळींग समितीतर्फे रविवारी देखील सर्व सदस्य नेहमीप्रमाणे किल्ल्यावर वृक्षरोपणासाठी गेले असतांना किल्ल्याच्या एका प्रथम दर्शनीच्या उजव्या दिशेला घोड्याची पागा परिसराच्या जवळपास वृक्ष लावण्यासाठी खड्डा तयार करत असतांना त्याजागी एक छोटी पाषाणामधील महादेवाची पिंड आढळली. श्रावण महिन्यात साक्षात महादेवाची पिंड किल्यांवर सापडल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. किल्ले लळींग समितीतर्फे गेले 4 ते 5 वर्षांपासून विविध उपक्रम राबविले जात आहे.

कुठल्या न कुठला कारणास्तव समितीचे सदस्य किल्ल्यावर जात असतात. विविध कार्यक्रम असो किंवा श्रमदान असो किंवा पावसाळा आला की वृक्ष रोपण किंवा उन्हाळ्यात वृक्ष जगवण्यासाठी पाणी देणे आदी नियमित कामे करीत आहे.

पिंड तेराव्या शतकातील असल्याचा अंदाज
किल्ले लंळीग समितीच्या सदस्यानी ही माहिती पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांना कळवली. सदस्यांनी त्या पिंडीची छोट्या स्वरूपात प्राणप्रतिष्ठा देखील केली आणि तात्पुरता स्वरूपात आता एका मंदिरात ठेवण्यात आली आहे. हा किल्ला इ. स.1300 व्या शतकात बांधला गेला आहे. फारुकी राजाने बांधला आहे असे इतिहास अभ्यासक सांगतात. नंतरच्या काळात पूर्णपणे निजामशाही राजवट होती. किल्ल्यावर म्हणजे साधारणतः इ. स.1700 च्या काळापर्यंत हा किल्ला निजामशाहीकडेच होता. त्यानंतर हा किल्ला होळकरांच्या आधिपत्याखाली आला. म्हणजे साधारणतः ही पाषाणतील पिंड इ. स.1700 व्या काळातील देखील असावा असा अंदाज देखील लावता येऊ शकतो. किंवा 1300 शतकाचा आधीची सुद्धा असू शकतो .ते इतिहास चा अभ्यासक च सांगू शकतात .येणार्‍या काळात जर किल्ले वर संशोधन केले गेले तर काळाचा ओघात गाडल्या गेलेला बर्‍याच गोष्टी व इतिहास बाहेर येऊ शकतो , अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.