धुळे । गड स्वच्छता सन्मान सोहळा मुंबई येथे गुरूवार 23 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. या सन्मान सोहळ्यात धुळे जिल्ह्यातील एकमेव किल्ले संवर्धन करणारी संस्था किल्ले लळींग संवर्धन समितीचा देखील सन्मान करण्यात आला. सन 2016-2017 या कालावधीत पुरातत्व व वास्तुसंग्रहालय तसेच गड संवर्धन समित्याच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील विविध गडकोटा येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. ह्या मोहिमेत किल्ले लळींग संवर्धन समितीने देखील सहभाग घेतला होता.
सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
आज पर्यंतचा हा त्यांचा पहिला सन्मान होता व हा सन्मान काल महाराष्ट्र शासन व पुरातत्त्व वास्तुसंग्रहालय यांच्याकडून काल किल्ले लळींगला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. तसेच ह्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, सांस्कृतिक सांस्कृतिक कार्य विभाग प्रधान सचिव नितिन गद्रे प्रमुख उपस्थिती उप सचिव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग संजय भोकरे, गड संवर्धन समिती प्रमुख मार्गदर्शक पांडुरंग बलकवडे व ह्या कार्यक्रमाचे विनीत संचालक पुरातत्त्व व वास्तुसंग्रहालय डॉ.तेजस मदन गर्ग, किल्ले लळींग समितीला वेळोवेळी मार्गदर्शन करणार्या सह्ययक संचालक पुरातत्व विभाग नाशिक जया वाहणे आदी उपस्थित होते. सन्मान स्वीकारताना किल्ले लळींग संवर्धन समितीचे व सन्मान मिळ्याल्यावर बबलु पाटील यांची प्रतिक्रिया हा सन्मान खर्या अर्थाने त्या किल्ले लळींग गावाचा किल्ले साठी मार्गदर्शन करणार्या चा हा सन्मान किल्ले वर असंख्य शेकडो हात राबतात हा सन्मान खर्या अर्थाने त्याचा आहे.