किल्ले सिंहगड झाले प्लॅस्टिकमुक्त!

0

पिंपळे सौदागर : मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समिती, पिंपरी-चिंचवड शहर व मित्र परिवाराच्यावतीने किल्ले सिंहगड येथे स्वच्छता अभियान घेण्यात आले. या मध्ये किल्ल्यावर दोनशे पंचवीस नागरिक, संघाचे पदाधिकारी यांनी सिंहगडावरील कचरा जमा केला. स्वच्छता अभियान उपक्रमामध्ये ह.भ.प.शिवकीर्तनकार, डॉ प्रा. गजानन वाव्हळ महाराज यांनी किल्ले कोंढाणा (सिंहगड) याचा संक्षिप्त इतिहास आपल्या वाणीतून सांगितला. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी समोर गेल्या 30 वर्षापासून सेवा करणारे संभाजी दगडू डिबळे, सिंहगडावरील पर्यावरणासाठी अहोरात्र झटणारे वनपरिक्षेत्र भाम्बुर्डे तसेच पुणे येथील अधिकारी दीपक पवार, रमेश जाधव, हेमंत मोरे यांनी उपक्रम यशस्वी करण्यास विशेष सहकार्य केले. प्रकाश बंडेवार व गोपाळ माळेकर यांनी सर्वांचे आभार मानून शिवप्रार्थना घेवून कार्यक्रमाची सांगता केली.