चाळीसगाव – राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस काल साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने आज त्यांची तालुक्याचे जनसेवक किशोर पाटील ढोंमणेकर यांनी कार्यकर्त्यांसह भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छासाठी कसलाही खर्च न करण्याचे आवाहन केले होते. त्याऐवजी जमेल तितकी रक्कम मुख्यमंत्री फंडात द्यावी ती रक्कम गरजू शेतकर्यांना मदत स्वरुपात दिली जाणार आहे. त्यांचा हा उपक्रम खुपच कौतुकास्पद असल्याने आज किशोर पाटील ढोंमणेकर यांनी एक लाख रुपयांची देणगी दिली आहे. याप्रसंगी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, सहकार पणन व वस्त्र उद्योग मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते.