किश्तवाडमधील अपघातात ३५ जणांचा मृत्यू; मोदींनी वाहिली श्रद्धांजली

0

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडमध्ये आज सोमवारी सकाळी बस दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात ३५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केले आहे. किश्तवाडमध्ये झालेला अपघात हृदयद्रावक असल्याचे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले. तसेच अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे.

सध्या घटनास्थळी प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे. बस केशवानहून किश्तवाडला जात असताना हा अपघात झाला. यामध्ये जखमी झालेल्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या भीषण अपघाताबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीदेखील दु:ख व्यक्त केले.