किश्तवाडमध्ये बस दरीत कोसळली; ३३ प्रवासी ठार

0

किश्तवाड: जम्मू काश्मरीच्या किश्तवाडमध्ये एक बस दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यात ३३ प्रवासी ठार झाले आहेत. तर २२ जण जखमी झाले आहेत. केशवानहून किश्तवाड या ठिकाणी ही बस चालली होती. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. जे जखमी झाले आहेत त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचंही त्यांनी म्हटलंय. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन पोहचलं असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. या अपघातात बस चालकाचाही मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेबाबत माहिती घेतली असून दुःख व्यक्त केले आहे.