किसन चवंडके यांचे निधन

0

हडपसर । हडपसरमधील कालिका दूध डेअरीचे संचालक व वीरशैव लिंगायत समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते किसन सखाजी चवंडके यांचे (वय 61) नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते पुणे लष्कर भागातील गवळी वाडा येथील पापा वस्ताद तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष होते. पत्रकार मनोज जयराम बिडकर यांचे ते काका होते. त्यांच्यावर टिम्बर मार्केटमधील जानाई मळ्यामधील लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.