दुष्काळ, निवडणुका बद्दल भूमिका करणार स्पष्ट
अंबाजोगाई : किसानपुत्र आंदोलनाचे 5 वे राज्य स्तरीय शिबीर २० व २१ ऑक्टोबर 18 रोजी अंबाजोगाई येथे होत आहे. यापूर्वी मुंबई, नागपूर, आळंदी व जळगाव येथे ही शिबिरे झाली आहेत. दुष्काळ आणि येऊ घातलेल्या निवडणुका या मुद्द्यांवर किसानपुत्र आपली भूमिका ठरवतील. शिवाय निरनिराळ्या न्यायालयात याचिका दाखल करणे व १९ मार्चचा उपवास यावरही निर्णय केले जातील.अशी माहिती प्रसिद्धीपत्राकाद्वारे देण्यात आली आहे.
पहिला दिवस वैचारिक चर्चेचा आणि दुसरा दिवस रणनीती वरील चर्चेचा असे शिबिराचे स्वरूप असणार आहे. या शिबिरासाठी शिबिरार्थींना टिपणे दिली जाणार आहेत. महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यातून ७० किसानपुत्र या शिबिरात सहभाग घेतील.
शिबिरार्थींशी चर्चा करण्यासाठी अमर हबीब, सागर पिलारे, संजय सोनवणी, प्रमोद चुंचुवार, राजीव बसरगेकर, शामसुंदर सोन्नर, अनंत देशपांडे, मकरंद डोईजड, गजानन अमदाबादकर, ईश्वर लिधुरे, मयूर बागुल, राहुल म्हस्के, नितीन राठोड, बरुण मित्रा (दिल्ली), संदीप कडवे (म.प्र.), स्वाती झा (बिहार) हे उपलब्ध असणार आहेत. आद्यकवी स्वामी मुकुंदराज यांच्या समाधी परिसरात निसर्गरम्य वातावरणात हे शिबीर होणार आहे.